Monday , August 24 2026
Breaking News

संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उदघाटनच्या दिवशी संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर आनंद चव्हाण, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, बापूसाहेब देसाई, जयसिंग धनाजी, हर्ष रेडेकर, ओमकार गावडे, मंजुळा, शिवकुमार सुतार, बसवंत पाटील या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचे पूजन खेळाडूंची ओळख व फुटबॉल चेंडूला ठीक मारून विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी पाहुण्यांनी खेळाडूंना जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन आत्मसात केल्यास यश नक्की संपादन करता येते असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले, याप्रसंगी पंच मानस नायक, आदित्य सानी, स्वयम काकतकर, प्रणव देसाई, श्रीकांत कांबळे, स्वरूप हलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

Spread the love  बेळगाव : श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *