Monday , August 24 2026
Breaking News

बोरगाव येथील अरिहंत सभागृहात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘सहकार सप्ताह’‌साजरा करण्यात येणार आहे. सहकार विभाग, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बेळगांव, विविदोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ बोरगांव, श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; बोरगांव (मल्टी-स्टेट) अरिहंत हॉस्पिटल, बेळगांव, लट्ठे शैक्षणिक संस्था, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक महाविद्यालय, बेडकिहाळ-शमनेवाडी आणि अरिहंत उद्योग समूहातर्फे शुक्रवारी (ता.३) बोरगाव येथील अरिहंत सभागृहात सकाळी ‌९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये संगणकाद्वारे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन आणि इतर समस्यांवर कमी दरात उपचार व तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय चष्मे, रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्सची सुविधा,दृष्टीदोष आणि डोळ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, ईसीजी, मधुमेहावरील उपचार, रक्तदाबावरील उपचार, हृदयविकार, हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *