मुख्यमंत्री सिद्धरामय्या; पंतप्रधान मोदी प्रचारावर जगतात बंगळूर : केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला मी शून्य गुण देईन, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. पंतप्रधान मोदी फक्त प्रसिद्धीवर जगले असल्याचा त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज म्हैसूर येथे पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले की, मोदी …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्ली भेटीवर
पक्षाच्या हायकमांडशी करणार चर्चा; शिवकुमार दिल्लीत दाखल बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. १०) नवी दिल्लीला जाणार असून काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. ते ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीसह विविध घडामोडींवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही एका निवेदनात, मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दिल्लीला जात असल्याचे म्हटले आहे. सिद्धरामय्या …
Read More »कुसमळी येथील नदीवरील पर्यायी पुलाची दुरुस्ती; दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला
खानापूर : बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल खचल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक रविवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी दिवसभर पर्यायी खचलेल्या रस्त्यावर दगड, माती टाकून काँक्रीट घालून सदर रस्ता मंगळवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला केला आहे. बेळगाव-जांबोटी-गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी-बारावी प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान समारोह
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त मेजर जनरल के. एन्. मिरजी उपस्थित होते. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य अतिथिंच्याहस्ते भारतमाता, अहिल्यादेवी …
Read More »मराठा सेवा संघातर्फे उद्या मेळावा
बेळगाव : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मराठा सेवा संघ बेळगाव शाखेचा मराठा व्यवसाय विभाग व पुण्यातील लक्ष्य एज्युकेशन सर्व्हिसेसतर्फे मराठा उद्योजकांसाठी मंगळवारी (दि. १०) मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. गणेश कॉलनी, वडगावमधील मराठा सेवा संघाच्या हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोल्हापूरमधील माईंड ट्रेनर व मोटिव्हेशनल स्पीकर विनोद कुराडे व्यवसाय वाढीसाठी …
Read More »पोलीस आयुक्तांसह ११ अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची वाल्मीकी समाजाची मागणी
बेळगाव : बंगळूरु येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी बंगळूरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सरकारच्या आदेशाचा निषेध करत आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. बंगळूरु चेंगराचेंगरीच्या घटनेची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारण्याऐवजी, ती पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बोलताना, वाल्मीकी …
Read More »मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्यापासून; मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याची दुकाने सज्ज
खानापूर : मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्या मंगळवार दिनांक 10 व बुधवार दिनांक 11 जून असे दोन दिवस चालणार आहे. या अगोदर गावात चार मंगळवार पाळण्यात आले. हा पाचवा मंगळवार मूर्ग नक्षत्र सुरू झाल्यावर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीची यात्रा भरते. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मंदिरासमोर मंडप घालण्यात …
Read More »भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने पार पडला विवाह!
बेळगाव : धार्मिक रीतीरिवाजांना फाटा देऊन भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने शहरात एक अभिनव व ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला. शहरातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांच्या कनिष्ठ पुत्राचा विवाह संविधानाची शपथ घेऊन पार पडला, ज्याने सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली आहे. ऍड. विशाल चौगले (वर) …
Read More »बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण; आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव
बंगळुरु : आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल …
Read More »ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जींची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह आणि जवानांसह शांताई सेकंड होम या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमातील आजीबाईंनी ब्रिगेडिअर मुखर्जींचे पारंपरिक आरतीने उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. वृद्धाश्रमातील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta