Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

2 ऑक्टोबर रोजी साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनमध्ये दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा.सौ. मानसी दिवेकर कोल्हापूर यांचे साहित्य लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन केले जाणार …

Read More »

दक्षिण उपनोंदणी कार्यालयाचे जिल्हाधिकारी आवारामध्ये स्थलांतर

बेळगाव : बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालय दक्षिण भागात स्थलांतरित केल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून सदर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्थलांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे. दक्षिण उपनोंदणी कार्यालय भाडीत्रो इमारतीत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच हे कार्यालय शहरापासून सात …

Read More »

विद्या आधार योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत

  बेळगाव : रद्दीतून बुद्धी या आशयांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विद्या आधार या योजनेच्या माध्यमातून आज जीआयटी महाविद्यालयातील एका गरजू विद्यार्थ्याला आर्थिक सहकार्य करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्याहस्ते विद्यार्थ्याला १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. विद्या आधार योजना ही जुन्या कचऱ्यातून जमा झालेल्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक …

Read More »

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात …

Read More »

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेला ६.३४ लाखाचा नफा

  लक्ष्मण चिंगळे; ९.७५ टक्के लाभांश जाहीर निपाणी (वार्ता) : संस्थेचे भागभांडवल २९ लाख ३० हजार, राखीव व इतर निधी ४८ लाख ९६ हजार, ठेवी ९० लाख ९७ हजार, कर्जे ७६.७३ लाख, खेळते भांडवल १ कोटी ६९ लाख, वार्षिक उलाढाल ४ कोटी ८० लाख होऊन ६ लाख ३४ हजाराचा नफा …

Read More »

दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्याकडून भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम

  बेळगाव : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठान बेळगाव-चंदगड विभाग व श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव किल्ला स्वच्छता मोहीम फत्ते झाली. गडावरील श्री दुर्गा माता मंदिरात नवरात्री उत्सव मिलिटरी मार्फत मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मुख्य प्रवेशद्वार, बुरुज आणि लगतची तटबंदी वरील अतिप्रमाणात वाढलेली झाडेंझुडूपे काढून टाकण्यात …

Read More »

विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  कागवाड : कागवाड तालुक्यानजीक असलेल्या महाराष्ट्रातील म्हैसाळ (ता. मिरज) गावात विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी शेतकरी असलेल्या वनमोरे कुटुंबातील चौघेजण गुरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी उसाच्या शेतात विजेची तार तुटून जमिनीवर पडली होती. याकडे लक्ष न देता …

Read More »

डुकरांशी भांडू नका; एडीजीपी चंद्रशेखरांचा कुमारस्वामींवर प्रहार

  कुमारस्वामींची कारवाईची मागणी बंगळूर : डुकरांशी लढलो तर आम्ही घाणेरडे होऊ, असे म्हणत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर एसआयटीचे प्रमुख एडीजीपी चंद्रशेखर यांनी जोरदार प्रहार केला आहे. दरम्यान, धजदने अधिकारी चंद्रशेख यांच्यावर आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बंगळुर येथील जे. पी. भवन …

Read More »

ग्रामीण व यमकनमर्डीमधून मध्यवर्ती म. ए. समितीवर 25 जणांची नावे जाहीर

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नियंत्रण या घटक समितीची बैठक रविवार दिनांक २९ रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे …

Read More »

संजीवीनी फौंडेशनच्या वतीने होणार ज्येष्ठांचा सन्मान!

  बेळगाव : येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनी समाजातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आर. एम. पाटील आणि गरीब रुग्णांना सेवा आणि आसरा देणाऱ्या करुणालयच्या संस्थापिका अनिता रॉड्रिग्स …

Read More »