Wednesday , April 22 2026
Breaking News

ग्रामीण व यमकनमर्डीमधून मध्यवर्ती म. ए. समितीवर 25 जणांची नावे जाहीर

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नियंत्रण या घटक समितीची बैठक रविवार दिनांक २९ रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे बेळगाव ग्रामीण मतदारसंघ व यमकनमर्डी मतदारसंघातील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्यपदी निवड करण्यासाठी नावे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर या बैठकीत यावर विचार विनिमय करून नावे ठरविण्यात आली, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. एम. जी. पाटील, बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, सुरेश राजूकर, किरण मोटणकर, बी. बी. देसाई, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील, लक्ष्मण होणगेकर, आर. एम. चौगुले, संतोष मंडलिक, मनोहर संताजी, मल्लाप्पा गुरव, आर. के. पाटील, पियुष हावळ, डी. बी. पाटील, प्रशांत पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. प्रसाद सडेकर, यमकनमर्डी मतदारसंघातून मनोहर हुंदरे, शिवाजी कुट्रे, लक्ष्मण पाटील, मनोहर हुक्केरीकर यांची निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत नागरी समस्या वरील चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. एम. जी. पाटील, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील, मोन्नाप्पा पाटील, रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी, मल्लाप्पा गुरव, संतोष मंडलिक, डी. बी. पाटील, पियुष हावळ, आर. के. पाटील, बी. एस. पाटील, दीपक पावशे, बि. डी. मोहनगेकर, बी. बी. देसाई, आर. आय. पाटील, कमल मन्नूरकर, तुळसा पाटील, मनोहर हुंदरे, अनिल पाटील, लक्ष्मण पाटील, रामचंद्र कुद्रेमणीकर, बाळासाहेब भगरे, नारायण सांगावकर, दीपक आंबोळकर, भरमा देसुरकर, यल्लाप्पा रेमानाचे, महेंद्र जाधव हे नियंत्रण घटक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *