खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावांच्या स्थलांतरासंदर्भात काढलेल्या आदेशावर विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. बैठकीचे प्रास्ताविक आणि स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. प्रारंभी बेळगाव तालुका समिती …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर
बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर विविध परवानगीसाठी सिंगल विंडो, रस्त्यांची दुरुस्ती, गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे, पाणपोईची व्यवस्था, मंडप परिसरातील स्वच्छता आदी विविध मागण्यांचे निवेदन आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. …
Read More »जीतो संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जितोतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात संस्थेचे चेअरमन वीरधवल उपाध्ये आणि उपक्रमाचे अध्यक्ष …
Read More »सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे
शाळा सुधारणा समितीची खानापूर येथे बैठक खानापूर : सर्व सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. राजकारण बाजूला ठेवून शाळेसाठी सतत प्रयत्न केल्यास सरकारी शाळा वाचविण्यात निश्चितच यश मिळेल, असे मत गंगाधर गुरव यांनी व्यक्त केले. ‘सरकारी शाळा वाचवा’ अभियानाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील शाळा …
Read More »बेळगाव शहर भक्तीसाठी प्रसिद्ध : परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज
बेळगाव : “तीस वर्षांपूर्वी वृंदावन प्रभुनी बेळगावात सुरू केलेल्या हरे कृष्णा आंदोलनाने आज भव्य असे स्वरूप प्राप्त केले आहे. बेळगाव शहर भक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळेच आजचा हा हजारोंचा जनसमुदाय श्रीकृष्ण भक्तीत न्हाउन निघाला आहे “असे विचार इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले. येथील …
Read More »कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, भारताला सर्वात मोठा धक्का
नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी …
Read More »खानापूर जंगलवासीयांनी मान्य केल्यास त्यांचे अन्यत्र स्थलांतर करू : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
खानापूर : खानापूर वनभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्यास त्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्र्यांशी आधीच बोलले आहेत. शेकडो वर्षांपासून तेथे लोक राहतात, वनविभागाच्या कायद्यानुसार गावकऱ्यांनी सहमती दर्शवली तर ते कुटुंबाला 15 …
Read More »स्नेहम कारखान्याला आग; एकाचा मृतदेह सापडला
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावच्या हद्दीतील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप निर्मिती कारखान्याला काल रात्री 8.45 च्या दरम्यान आग लागली. यामध्ये एकाचा मृतदेह सापडला असून तीन कामगार गंभीर भाजले असून त्यांना बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारुती करवेकर (32), यल्लाप्पा सालगुडे (35), रणजित पाटील (39) हे …
Read More »खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केली पाहणी
खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच खानापूर तहसीलदार यांनी आज खानापूर तालुक्यात पावसामुळे पडलेल्या घरांचा पहाणी दौरा केला. खानापूर तालुक्यात पावसामुळे एकूण 201 घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी 39 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असल्याचे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकार हे …
Read More »तालुका समिती अध्यक्ष कै. निंगोजीराव हुद्दार यांची उद्या शोकसभा
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. निंगोजीराव हुद्दार यांची शोकसभा गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे होणार आहे. तरी या शोकसभेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, सीमा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta