शाळा सुधारणा समितीची खानापूर येथे बैठक
खानापूर : सर्व सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. राजकारण बाजूला ठेवून शाळेसाठी सतत प्रयत्न केल्यास सरकारी शाळा वाचविण्यात निश्चितच यश मिळेल, असे मत गंगाधर गुरव यांनी व्यक्त केले. ‘सरकारी शाळा वाचवा’ अभियानाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील शाळा सुधारणा समितीची बैठक नुकतीच खानापूर येथे बोलावण्यात आली होती. त्यावेळी बैठकीला मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मनोहर हुंदरे यांनी मार्गदर्शन केले. खासगी शाळेचे महत्व कमी करण्यासाठी सरकारी शाळेत पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अधिकाधिक लक्ष द्यावे, आपल्या कारकिर्दीत शाळेकडे लक्ष देऊन आपली शाळा उत्तम दर्जाची कशी होईल हे पहावे, सर्व सदस्यांनी शाळेच्या कार्याला वेळ दिल्यास आपली शाळा नक्कीच चांगल्या दर्जाची होईल, असे हुंदरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित अध्यक्ष व सदस्यांनी समस्या मांडल्या. पुढील बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करून शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ठरविण्यात आले. यावेळी अनिल देसाई यांनी सुत्रसंचालन केले. विश्वभारती कला क्रीडा संघटना खानापूर शाखा यांच्यावतीने मनोहर हुंदरे, गंगाधर गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मष्णु चोपडे, रामाक्का हणबर, दामोदर कणबरकर, विनोद गुरव, इरफान तालीकोटी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुनीता येरमाळकर, गंगाराम गुरव, विश्वनाथ बुवाजी, प्रमोद कोलेकर, रामनाथ बुवाजी, शशिकांत जाधव, विनायक भुते, संदीप गुरव, सहदेव गावकर, महेश पाटील, महेश सावंत, ईश्वर बारगावकर, अपय्या कोलेकर, अमर गुरव, परशुराम पाटील, गणपती मुतगेकर, गोपाळ पाटील, रामन्ना नंदा, सदानंद लोहार, नारायण पडवळकर, विठ्ठल राऊत, रेणुका घाडी, कृष्णा भरणगेकर, विश्वभारती कला-क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी आदी मान्यवर उपस्थित होते तर मोहन गुरव यांनी आभार मानले.