Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणारे केंद्र सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम केले. ज्यांना शेतकऱ्यांच्या घामाची कदर नाही अशा शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. डॉ. निंबाळकर यांनी रविवारी (दि. २१) …

Read More »

जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा प्रचार

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून विविध भागात कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली आहे. जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे सरदेसाई यांचा प्रचार करण्यात आला यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाने उमेदवार सरदेसाई यांचे स्वागत करण्यात आले. …

Read More »

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात 18 जण रिंगणात

  चिक्कोडी :  लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली असून 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 18 उमेदवार रिंगणात आहेत. राजू सोल्लापुरे आणि इस्माईल मगदुम यांनी पक्षनिहाय उमेदवारी दाखल केली. भारतीय जनता पक्षाकडून अण्णासाहेब एस.जोल्ले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रियांका जारकीहोळी, जनता पार्टी पक्षाकडून …

Read More »

दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अद्याप जिवंत, ९ वर्षांनी छोटा राजनचा फोटो आला समोर

  मुंबई : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा करोना काळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. राजनचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्याचदरम्यान त्याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. मात्र छोटा राजन अद्याप जिवंत असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच राजनचा एक …

Read More »

माजी नगरसेवक संघटनेतर्फे जत्राटवेसमध्ये काँग्रेसचा प्रचार

  निपाणी (वार्ता) : शहरातील जत्राटवेस येथे नगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेतर्फे काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करण्यात आला. प्रारंभी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, चंद्रकांत जासूद, राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते मातंगी देवीची पूजा करण्यात आली. नगरसेवक रवी श्रीखंडे यांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या सभेत माजी सभापती किरण कोकरे, माजी …

Read More »

मुलानेच दिली हत्येची सुपारी; 8 आरोपींना अटक

  गदग : गदग येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मुलासह आठ आरोपींना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी गदग नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिकसह एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. घटनेच्या 48 तासांत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. या …

Read More »

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार

  शिमोगा : हुबळीची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत शिमोगा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, नेहाच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून आम्ही या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची …

Read More »

सार्वजनिक वाचनालयात उद्या “आम्ही वाचतो” कार्यक्रम

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि. 23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे बरेचसे विद्यार्थी वाचन करतात, जाणकारीने वाचतात, त्यांना साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम आवडतात, शिवाय विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ते भरपूर वाचन करतात, त्यामुळे पुस्तक …

Read More »

गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय

  आयपीएल २०२४ मधील ३७ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाबचा ३ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १४३ धावांचे लक्ष्य दिले होते, …

Read More »

समितीच्या अस्तित्वाचा लढा जिंकावा लागेल; निरंजन सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

    खानापूर : समितीच्या अस्तित्वाचा लढा जिंकावा लागणार आहे त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सीमा सत्याग्रही शंकर पाटील, …

Read More »