Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन

  पंढरपूर : आषाढी यात्रेनंतर येणाऱ्या प्रमुख पंढरपूर यात्रेतील कार्तिकी एकादशी यंदा १२ नोव्हेंबरला होणार आहे. त्या निमित्ताने ४ ते २० नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे; अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पंढरपूरला वर्षभर भाविकांची रीघ सुरु असते. मात्र …

Read More »

निपाणीत उरुसाला प्रारंभ

  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दर्गाह येथील महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब (क-स्व.) यांच्या उरूसाला चुनालेपनाने प्रारंभ झाला आहे. सोमवार (ता.१४) ते बुधवार (ता.१६) अखेर मुख्य कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, कुस्ती मैदानाचे आयोजन …

Read More »

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

  आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार राजवाड्यामध्ये ऐतिहासिक व पारंपारिक पद्धतीने दसरोत्सव पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी अमराईतील रेणुका मंदिराजवळ सोने लुटून दसरा साजरा करण्यात आला. शनिवारी (ता.१२) सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालून घट हलविण्यात …

Read More »

तीन लाखाचा विनापरवाना दारू साठा जप्त

  बेळगाव : गोव्याहून हावेरीला विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकूण तीन लाख 19 हजाराचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई अबकारी विभागाने रविवारी सकाळी केली. जमील निजामुद्दीन शिरहट्टी (वय48) रा. हावेरी तालुका हावनूर असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. अनमोड चेक पोस्ट नाक्यावर अबकारी विभागाने हे वाहन अडवून …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेच्या कणबर्गी शाखेचे उद्घाटन संपन्न

  बेळगाव : “एखादी बँक 118 वर्षे वाटचाल करते म्हणजेच ती आपल्या ग्राहकांच्या पैशांची किती काळजी घेते ते दिसून येते. पायोनियर अर्बन बँकेच्या आजवरच्या सर्वच चेअरमन आणि संचालकांनी जनतेच्या पैशाची काळजी घेतली आहे. बँकेतील पैसा इतरत्र ठिकाणी वापरलेला नाही आणि म्हणूनच या बँकेने चांगली प्रगती केली आहे. याही पुढे ही …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी शाळांना संजीवनी मिळावी

  निपाणी (वार्ता) : मराठी भाषेची निर्मिती ही शके ९०५ मध्ये लिहिलेल्या गोमटेश्वराच्या शिलालेखाद्वारे स्पष्ट होते. सुमारे अडीच हजार वर्षे प्राचीन व समृद्ध वारसा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही घटना मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. आता राज्यासह सीमा भागातील बंद पडलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांना संजीवनी मिळावी अशा आशयाचे …

Read More »

कडोली साहित्य संमेलन 19 जानेवारीला

  कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे 40 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. यापूर्वी 5 जानेवारी ही संमेलनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र याच तारखेला येळळूर साहित्य संमेलनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे समन्वय साधत 5 जानेवारी ऐवजी 19 जानेवारीला संमेलन …

Read More »

श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज विजयदशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. प्रारंभी मारुती मंदिर मारुती गल्ली येथे भल्या पहाटे धारकरी फेटा बांधून घेण्यास रांगेत उत्साहाने उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिर येथे प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे अकरावी वंशज ह. भ. प. श्री …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

  मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आठवड्याभरात अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दोन नेत्याच्या मृत्यूने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार …

Read More »

शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

  बेळगाव : बेळगावातील आणि शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. बेळगावातील श्री लक्ष्मी वेंकटेश मंदिराच्या रथोत्सवात शेकडो भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. व्यंकट रमण गोविंदाचा गजर रथ ओढताना भक्त करत होते. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मंदिराकडे …

Read More »