Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

मताधिक्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक

  सहकारत्न उत्तम पाटील ; प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ सभा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला पडलेले मते पाहता सुमारे एक लाख दहा हजारहून अधिक मते काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना पडली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे, असे मत सहकार्य उत्तम पाटील यांनी …

Read More »

समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघात यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दिसून येईल तसेच कणकुंबी आणि परिसरात समितीला मताधिक्य मिळेल, असे प्रतिपादन समितीचे ज्येष्ठ नेते मारुती परमेकर यांनी व्यक्त केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी कणकुंबी येथील माऊली देवी मंदिर येथून …

Read More »

नगरपरिषद उपाध्यक्षांच्या मुलासह चार जणांची निर्घृण हत्या

  गदग : गदग शहरातील दासर ओणी नगरपरिषद उपाध्यक्षा यांच्या मुलासह एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. बेळगावचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरात झोपलेल्यांची हल्लेखोरांनी भोसकून हत्या केली. एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झाल्याने गदग जिल्हा हादरला आहे. नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा सुनंदा …

Read More »

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य

  हुबळी : हुबळीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. आरोपी आणि पीडिता एकाच महाविद्यालयात शिकत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाज (वय २३) नामक आरोपीने २१ वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला. आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून …

Read More »

मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सवर ९ धावांनी निसटता विजय

  मुंबई : मुंबई विरूद्ध पंजाबच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटी बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत ९ धावांनी निसटता विजय मिळवला. आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांमध्ये मुंबईवर दबाव आणला खरा पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आशुतोष शर्माची विकेट मुंबईसाठी महत्त्वाची ठरली. १८व्या षटाकात कोएत्झीने …

Read More »

बेळगावातील एका नामांकित सहकारी संस्थेत “नोकर भरती” घोटाळा?

  बेळगाव : बेळगाव शहरात अनेक आर्थिक संस्था कमी वेळेत नावारूपास आल्या आणि त्याचप्रमाणे आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून चर्चेत देखील राहिल्या. अशीच चर्चा सध्या बेळगाव शहरातील बहुजनांची संस्था म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बँकेबाबत चर्चिली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आणि बहुजनांची को-ऑप. बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेत “नोकर भरती” …

Read More »

शनिवारी मराठा समाज, मराठी संघटनांची बैठक

  बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न व आरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाच्या एकत्र करण्यासाठी आगामी मंगळवार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगाव येथील जाहीर सभेसाठी नियोजनाची बैठक शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे …

Read More »

समितीला भरघोस मतदान करून अस्तित्व टिकवा; युवा समितीच्यावतीने आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे श्री. अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. महादेव पाटील (बेळगाव) व श्री. निरंजन सरदेसाई (कारवार) यांच्या प्रचारार्थ सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व समितीला भरघोस मतदान करून आपलं अस्तित्व …

Read More »

विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

  तेलंगणा : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेवर हल्ला झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या त्यानंतर संतप्त जमावाने शाळेवर हल्ला केला आहे. जमावाने शाळेत तोडफोड केली, तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांना जबर मारहाणही केली. संतप्त जमाव शाळेत घुसून …

Read More »

अत्यंत साध्या पद्धतीने प्रियंका जारकीहोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी आज चिक्कोडी येथील एसी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. वडिल मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रियंका जारकीहोळी यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज सादर केला. प्रियंका यांच्यासमवेत …

Read More »