Monday , September 21 2026
Breaking News

माडीगुंजी गावात डास निर्मूलन औषधाच्या फवारणीची मागणी

Spread the love

 

खानापूर : सध्या पावसाळा सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावात डास आणि माशांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारखे रोग फैलावत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून संपूर्ण गावात डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी मागणी गावातील युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत पीडीओकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करतेवेळी पंकज कुट्रे, संदीप घाडी, सुनील चव्हाण, संदेश पाटील, कार्तिक कुंभार, संतोष पाटील, किरण घाडी, संजय कुट्रे, सुमित गोरल, अनिल देसाई, राजू कोळी, परशराम मलिक, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *