कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शक्तीप्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले. आज सकाळी जिल्हाभरातून आलेल्या …
Read More »बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समाविष्ट करा
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी तसेच माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील खानापूर, …
Read More »कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते द्वारकेश यांचे निधन
बेंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक द्वारकेश यांचे आज निधन झाले. द्वारकेश ८१ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. १९ ऑगस्ट १९४२ रोजी म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर येथे जन्मलेले द्वारकेश हे वेगवेगळ्या भूमिकेतून घराघरात पोहचले होते. त्यांना आजाराने ग्रासले होते. द्वारकेश यांचे मंगळवारी (१६ एप्रिल) …
Read More »मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेळगावात ३० रोजी जाहीर सभा
बेळगाव: कर्नाटक सरकारच्या अन्यायविरुध्द लढा देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. सीमाभागातील मराठा समाज व मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना द्यावी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक १६ रोजी अंतरवाली …
Read More »कोगनोळी दुधगंगा नदीमध्ये मगरीचा वावर
कोगनोळी : येथील दुधगंगा नदीमध्ये पिरमाळ लगत असणाऱ्या सुतारकीजवळ मनोहर सुतार यांच्या शेतालगत मगरीचा वावर आढळून आला असून नदीकाठावर शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून दुधगंगा नदीमध्ये मगर दिसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. येथील शेतकरी प्रविण सुतार विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले असता नदीपात्रात मगर …
Read More »वाढदिनी लावली २५ हजाराची रोपे
शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपल्या वाढदिनी २५ हजार रुपयांची रोपे लावून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत अथणी उपस्थित होते. येथील …
Read More »५४९ धावा, ३८ षटकार, ८१ चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
बेंगळुरू : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३०वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने रेकॉर्डब्रेक कामगिरी करताना आरसीबीवर २५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रेव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर विक्रमी २८७ …
Read More »कागवाड-मिरज चेकपोस्टवर 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी आज सुमारे 16 लाख रुपये जप्त केले आहेत. कागवाड मतदान केंद्राच्या कागवाड-मिरज चेकपोस्टवर येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाहन क्रमांक केए 23, पी 1445 (सुझुकी बलेनो) मध्ये कागदपत्राशिवाय 16,05,600 रुपये घेऊन जात होते. जप्त करण्यात आलेली …
Read More »काँग्रेसची कुमारस्वामीविरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार
महिलांविषयी केले होते आक्षेपार्ह विधान बंगळूर : काँग्रेसच्या पाच हमी योजनांमुळे ग्रामीण भागातील महिला भरकटल्या’ अशा टिप्पणीबद्दल कर्नाटकातील काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि जधजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. राज्यातील सरकारविरुध्द धजद प्रदेशाध्यक्षांनी शनिवारी तुमकुर येथील सार्वजनिक रोड शोमध्ये हे विधान …
Read More »अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व एनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन
बेळगाव : “कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या सायमन एक्झिब्युटर्स यांचे हे प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये माणसाला आनंदात वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने उपयोगी ठरतात समस्त बेळगावकर या प्रदर्शनाचे निश्चित स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो” असे उद्गार बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta