Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

लोकसभा निवडणूक; समितीकडे महादेव पाटील यांचा अर्ज दाखल

  बेळगाव : आगामी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आज शुक्रवार दिनांक ५/४/२०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ज्येष्ठ नेते महादेव तुकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला. मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांनी अर्ज स्वीकारला. यावेळी रणजित चव्हाण पाटील, गुणवंत पाटील, रामचंद्र मोदगेकर, दत्ता जाधव, सागर पाटील, रणजित हावळानाचे, उमेश पाटील, प्रशांत …

Read More »

हुतात्म्यांच्या स्मारकाची उपेक्षाच!

  आंदोलनाला ६ रोजी ४३ वर्षे पूर्ण;१२ शेतकऱ्यांचे बलिदान निपाणी (वार्ता) : ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या आठवणीसाठी आंदोलन नगरात त्यांचे छोटे खाणी स्मारक केले आहे. त्या ठिकाणी प्रशस्त असे स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने दरवर्षी चर्चा केली जाते. त्यानंतर मात्र कोणतीच हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांचे हुतात्मा …

Read More »

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा बाहेर येणार

  नागपूर : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आला आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासंदर्भात समितीची रविवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 07/04/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव

  काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज (ता. ५ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या …

Read More »

अमित शहांचा दिल्लीत ईश्वरप्पांच्या भेटीस नकार; संतप्त ईश्वरप्पा बंडखोरीवर ठाम

  बंगळूर : येडियुरप्पा यांच्या कुटुंबाविरोधात संताप व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आता भलतेच संतापले आहेत. भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलाविले आणि भेट न देताच माघारी पाठविले. चन्नपट्टणम येथील रोड शो कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमित शाह बंगळुरला भाजप नेत्यांच्या …

Read More »

मृत्यूवर विजय मिळवणारा सात्विक; २० तासाच्या ऑपरेशननंतर कूपनलिकेतून सुरक्षित सुटका

  बंगळूर : विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावातील बागेत कूपनलिकेत पडलेल्या सात्विक या दोन वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी रात्रभर राबवण्यात आलेल्या ऑपरेशनला यश आले आहे. पोलिस, अग्नि शामक दल, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या २० तासांच्या ऑपरेशननंतर मुलाला वाचवण्यात यश आले. कूपनलिकेतून बाहेर काढलेल्या सात्विक नावाच्या मुलावर तात्काळ प्राथमिक उपचार करून रुग्णालयात …

Read More »

हलगा-मच्छे बायपासला उच्च न्यायालयाची स्थगिती

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपासप्रकरणी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका दिला आहे. गुरुवारी (दि. ४) न्यायालयाने बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली. या आदेशामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू केलेल्या महामार्ग प्राधिकरणाला पुन्हा गाशा गुंडाळावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. हलगा-मच्छे …

Read More »

शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात

  शशांक सिंहच्या ६२ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने शानदार विजय मिळवला. इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह यांनी डेथ ओव्हर्समध्ये वादळी फलंदाजी करत संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जने १ चेंडू बाकी ठेवत लक्ष्य गाठले आणि सामना ३ गडी राखून जिंकला. गुजरातने दिलेल्या २०० धावांच्या …

Read More »

गणेशपुर भागातील एका कॉलनीत विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल

  बेळगाव : गणेशपूर भागातील एका रहिवासी कॉलनीमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एम ई एस कॉलनी मधील खुल्या जागेत काही वर्षांपूर्वी कॉलनीतील दानशूर लोकांच्या सहभागातून लहानसे गणेश मदिर उभारण्यात आले आहे. सदर जागेचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याने लोकप्रतिनिधींच्या मदतीने निवडणुकीच्या तोंडावर सदर जागेच्या विकासाचा नारळ फोडण्यात …

Read More »