Monday , September 21 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने तारिहाळ येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने पूर्व प्राथमिक शाळा तारिहाळ येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे उपाध्यक्ष वासु सामजी हे होते. दरवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांना युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. आज या कार्यक्रमाला तारिहाळ ग्राम पंचायत अध्यक्ष नामदेव जोगणावर, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष रमेश खनगांवकर, मुख्याध्यापिका श्रीमती जि. एस. पिसे सहशिक्षिका अंकिता बेनके, सहशिक्षक मल्लिकार्जुन भानविहाळ, एसडीएमसी सदस्या रेश्मा मोदगेकर, एलआयसी विमा प्रतिनिधी गंगाराम पावटे हे सर्व उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *