Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

पश्चिम बंगालमधील आमदार, मंत्र्यांच्या वेतनात 40 हजारांची वाढ

  कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या पगारात आता दरमहा 40 हजार रुपयांची वाढ केली. पश्चिम बंगालमधील आमदारांना मिळणारे वेतन हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याने आता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण …

Read More »

महाडिक गटाला मोठा धक्का, राजाराम कारखान्यातील शौमिका महाडिकांसह 1272 सदस्य अपात्र

  कोल्हापूर : महाडिक गटाला मोठा धक्का बसला असून राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1272 सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबीयांतील 10 जणांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर साखर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या आधीच बोगस सभासदांचा …

Read More »

निपाणी ते बोरगाव- इचलकरंजी रस्त्याची दयनीय अवस्था!

  निपाणी : निपाणी ते बोरगाव इचलकरंजी नव्याने केलेला रस्ता पहिल्या पावसाळ्यातच वाहून गेल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. ममदापूर बस स्टॅन्डजवळ भर रस्त्यात मोठा खड्डा पडल्यामुळे त्या ठिकाणी मधोमध सिमेंटचा बॅरल लावलेला …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निपाणीला धावती भेट

  रस्ता कामांची पाहणी; नागरिकांच्या समस्या तशाच निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांची मदत संपल्याने या पालिकेचा पदभार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आहे. पण या शहराकडे ते बऱ्याच महिन्यापासून आलेले नव्हते. मात्र बुधवारी (ता.६) सायंकाळी शहर आणि उपनगरांना भेट दिली. यावेळी त्यांनी नगरोत्थान योजनेच्या चौथ्या टप्प्यात मंजूर झालेल्या निधीतून सुरू …

Read More »

निपाणी हालसिद्धनाथची निवडणूक होणार बिनविरोध

  शेवटच्या दिवशी जोल्ले समर्थकांचे ५ अर्ज; विरोधी गटाकडून एकही अर्ज नाही निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांना मानणाऱ्या ५ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ३९ झाली आहे. पण विरोधी …

Read More »

मनपा महापौर तसेच आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

  बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडंगुडी यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, रस्त्यांवर लोंबकळणार्‍या वीजतारांचे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्त अशोक दुडंगुडी ,शहर अभियंता सचिन कांबळे, …

Read More »

आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. मनोज शिवाजी पवार हे होते. श्री. पी. ए. पाटील यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर उपाध्यक्ष श्री. संतोष शिवाजी पवार यांनी 2021 ते 2023 सालचा अहवाल व ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवण्यात आला. सर्व सदस्यांनी …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे आचार्य अत्रे विशेष व्याख्यानमाला

  बेळगाव : प्रख्यात साहित्यिक, पत्रकार, नाटक कार आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आचार्य अत्रे विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध नाटक कार व दिग्दर्शिका प्रा. संध्या देशपांडे या गुंफणार आहेत. आचार्य अत्रे यांचे मराठी नाट्यस्रुष्टीतील योगदान हा त्यांच्या …

Read More »

गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीला परवानगी नाही

  मंडल पोलीस निरीक्षक तळवार : गणेशोत्सवाबाबत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव सर्वांना शांततेत साजरा करावयाचा असून सर्व मंडळानी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी वापरण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. इतर किरकोळ आवाजाच्या साधना बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने …

Read More »

विश्वकर्मा समाजाला ओबीसी दर्जा द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  बेळगाव : सध्या विश्वकर्मा समाजाला देण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्रात हिंदू मराठा असा उल्लेख केला जातो. त्याऐवजी हिंदू पांचाळ विश्वकर्मा असा उल्लेख करुन समाजाचा समावेश मागासवर्ग २अ मध्ये (ओबीसी) करावा, अशी मागणी विश्वकर्मा सेवा संघातर्फे बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तत्पूर्वी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जात …

Read More »