Sunday , July 26 2026
Breaking News

महालक्ष्मी सोसायटीच्या नुतन इमारतीचे बेळवट्टीत उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : बेळवट्टी-बाकनूर (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे बांधण्यात आलेल्या नूतन कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते. निवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर बी. बी. देसाई यांच्या हस्ते फीत कापून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
वाय. पी. नाईक यांनी सोसायटीने अल्पावधीत केलेल्या प्रगतीचा गौरव केला. सहकार हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. सहकाराच्या माध्यमातून अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. महालक्ष्मी सोसायटीने याच सहकाराच्या माध्यमातून गरजू लोकांना आर्थिक मदत करून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या आहेत, असे ते म्हणाले. सोसायटीचे अध्यक्ष देसाई यांचा त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कारही केला.
बी. बी. देसाई यांनी सोसायटीच्या प्रगतीचा अहवाल सादर करून भावी योजनांची माहिती दिली. संचालक नारायण नलावडे, पांडुरंग नाईक, तुकाराम कांबळे यांचीही भाषणे झाली. यावेळी कंत्राटदार प्रभाकर चौगुले, सुशांत महाराज व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. एन. जे. नलावडे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी जाफरवाडी येथील सुशांत महाराज यांच्या पौरोहित्याखाली वास्तुशांती व लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी बेळवट्टी येथील भजनी मंडळाच्या संगीत कार्यक्रमाने सांगता झाली.
कार्यक्रमास उपाध्यक्ष परशराम गाडेकर, अप्पू नाकाडी, अर्जुन पाटील, तुकाराम कांबळे, मधू नलावडे, अशोक मजुकर, सावित्री चौगुले, वैष्णवी सुतार, निर्मला गायकवाड, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष लुमाण्णा नलावडे, सातेरी चांदीलकर नामदेव गाडेकर, मारुती कांबळे, कृष्णा देसाई, नामदेव गायकवाड, बाळकृष्ण पाटील, रामलिंग सावंत, मोनाप्पा सुतार, विठ्ठल चौगुले, भिकाजी देसाई, पैलवान शट्टूप्पा पाटील, बाळकृष्ण नलावडे, ज्ञानेश्वर चौगुले, मयुरी हरगुडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *