येळ्ळूर : येळ्ळूर गावचे सुपुत्र, आनंद नगर वडगाव येथील रहिवाशी, आदर्श विद्यामंदिर कॉम्पोझिट ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक, आनंद नगर रहिवासी मंडळ, शिव मंदिर ट्रस्ट वडगावचे माजी अध्यक्ष, समाज शिक्षण संस्था येळ्ळूरचे संचालक, प्राध्यापक बळीराम लक्ष्मण कानशिडे यांचे 82 व्या वर्षी यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. आज मंगळवार 14 …
Read More »खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा शाॅकने घेतला जीव
पन्हाळा (जि. कोल्हापूर) : भर दिवाळीत थरकाप उडवणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षीमध्ये उघडकीस आली आहे. खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या चोरून शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60, दघे रा. राक्षी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोन …
Read More »कार दुरुस्त करताना इमारतीला लागली आग, ९ जणांचा मृत्यू
हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना हैदराबादमधील एका चार मजली इमारतीत आग लागल्यामुळे इमारतीतल्या नऊ रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नामपल्ली बाजार घाट परिसरातल्या इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं. तोवर …
Read More »आप्पाचीवाडीजवळ अपघातात चार गंभीर जखमी
कोगनोळी : आप्पाचीवाडीजवळ अंधार लक्ष्मी मंदीर परिसरात मोटर सायकल व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. यामध्ये मोटर सायकल वरील दोघे तर कार मधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोलाहून आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी जात …
Read More »गायरान अतिक्रमणसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय
बेळगाव : बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी नव्याने सर्व्हे करण्यात यावा, या मागणीसाठी सर्व समाजाच्यावतीने गुरुवार दि. 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्याल्यावर मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णय बिजगर्णी गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महालक्ष्मी यात्रेच्या निमित्याने आज सोमवारी सकाळी बिजगर्णी गावकऱ्यांची बैठक पार …
Read More »मथुरेच्या फटाकेबाजारात लागली भीषण आग, ७ दुकाने भस्मसात, फायरमॅनसह ९ जण होरपळले
मथुरा : शहरातील गोपालबागमध्ये फटाके बाजारातील काही दुकानांमध्ये रविवारी आग लागल्याने ७ दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीमध्ये एका फायरमनसह ९ जण होरपळले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की, या ७ दुकानांकडे फटाके विकण्याची परवानगी होती. या दरम्यान, महावनचे क्षेत्राधिकारी आलोक सिंह यांनी सांगितले …
Read More »बालकाच्या जिवदानासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : केंचापूर गल्ली, खानापूर येथील शिवांश बिर्जे या मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया रोगग्रस्त अवघ्या 8 महिन्यांच्या बालकावरील उपचारासाठी, त्याला जीवदान देण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवांश बिर्जे हा बालक मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया नामक रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. सध्या त्याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीचे वेदनादायी उपचार सुरू असले तरी जीवनदान मिळण्यासाठी …
Read More »महाराष्ट्रात जाणारी ऊसाची वाहने अडवली
स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा : हालशुगरला दिली खर्डा भाकरी निपाणी (वार्ता) : गतवर्षाच्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० चारशे रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१२) सायंकाळी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रा.एन. आय. …
Read More »बुधवारी पदग्रहण, गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा
भाजपचे नुतन अध्यक्ष विजयेंद्र यांची माहिती बंगळूर : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी (ता. १५) पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. जगन्नाथ भवन येथे सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते तुमकूर येथे पत्रकारांशी बोलत होते. मावळते …
Read More »एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या
उडुपी येथील घटनेने हळहळ बंगळूर : संपूर्ण राज्यात दिवाळीचा सण सुरू असतानाच दूरच्या उडुपीमध्ये एक अमानुष कृत्य घडले आहे. मास्क घातलेल्या मारेकर्याने अचानक घरात घुसून एकाच कुटुंबातील चार जणांना चाकूने वार करून ठार केले आणि वृद्ध महिलेला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. उडुपीमधील हम्पनकट्टेजवळील नेजारीच्या तृप्ती लेआउटमध्ये रविवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta