बेळगाव : मार्केट पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक करून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. संतोष शिवप्पा बेव्हिकोप्प वय 29 रा.इंचल सौन्दत्ती आणि अबुबकर सिकंदर सवदी वय 21 रा. श्रीनगर गार्डन बेळगाव अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑगस्ट 2023 रोजी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत खडेबाजार रोडवर …
Read More »शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करावा; कडोली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली, देवगिरी, जाफरवाडी, केदनूर व मन्नीकेरी येथील शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे करण्यात आली. शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने सदर निवेदनाचा स्वीकार करत योग्य ती कारवाई करण्याचे …
Read More »एनईपी रद्दच्या निर्णयाविरोधात अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन
बेळगाव : कर्नाटक सरकारने पुढील वर्षापासून राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बेळगाव शहर शाखेतर्फे आज गुरुवारी सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय …
Read More »जैन समाजाकडून त्याग व लोककल्याणतेला प्राधान्य
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगाव येथे मुकुटसप्तमी कार्यक्रम निपाणी (वार्ता) : मानव जातीच्या कल्याणासाठी जैन मुनीनी मोठा त्याग केला आहे. जैन धर्मात अहिंसा व त्याग याला विशेष असे महत्त्व आहे. पाच महिने चालणाऱ्या या चातुर्मास काळात प्राणी पक्ष्यांची हिंसा टाळून लोककल्याणासाठी विविध विधिवत पूजा व शिबिराचे आयोजन …
Read More »भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी! कार्लसन झाला विश्वविजेता
बाकू (अझरबैजान) : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी …
Read More »मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत यश
खानापूर : नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय पातळीवरील क्रिडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल मणतुर्गा या शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. मुलींमध्ये कुमारी- प्रिया बिर्जे 800 मी. व 1500 मीटर धावणेत प्रथम, कुमारी – कोमल. सांबरेकर 3000 मी. धावणे प्रथम व 1500 मी …
Read More »नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरपर्सन पदी डॉ. सोनाली सरनोबत यांची अविरोध निवड
बेळगाव : नुकतीच नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांची चेअरपर्सन पदी व श्री. भरत राठोड यांची व्हाईस चेअरमन म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कोरोना काळात नियती सोसायटीची स्थापना डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने करण्यात …
Read More »निडगलात हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिराचा स्लॅब भरणी उत्साहात
खानापूर : निडगलात (ता. खानापूर) येथील हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य व पीकेपीएसचे चेअरमन नारायण कार्वेकर, पीकेपीएस संचालक शंकर पाटील, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर, ग्रामपंचायत …
Read More »नेपाळमधील बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, सहा भारतीयांसह सात जणांचा मृत्यू
काठमांडू : नेपाळच्या बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा भारतीय नागरिकांचा समावेश असून एक नागरिक नेपाळचा आहे. मृत्यू झाला. सर्व मृत भारतीय नागरिक हे राजस्थान जिल्ह्यातील होते. तर नेपाळच्या महोत्तरी जिल्ह्यातील लोहारपटी-5 मधील एक नागरिक या दुर्घटनेत मृत …
Read More »बेळगावचे स्केटर्स राज्य रँकिंग रोलर स्केटिंगमध्ये चमकले
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 या स्पर्धेत चांगली चमक दाखवत चार पदकांची कमाई केली. 2 री कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 ही स्पर्धा गेल्या 18 ते 20 ऑगस्ट रोजी बेंगळुरू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta