बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकऱ्यांनी तीन दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात बँका बंद राहतील मात्र एटीएम सुरू राहणार आहेत, असे लीड बँकेचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विकेंड लॉकडाऊनच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच लॉकडाऊन होणार आहे. तीन दिवसांत केवळ अत्यावश्यक वस्तु वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. या काळात बँकाही बंद राहणार आहेत. एटीएम मात्र ग्राहकांसाठी सुरू राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta