
बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या श्री तुकाराम को-ऑप. बँकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीज कार्यक्रम गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला.
फाल्गुन महिन्यात येणाऱ्या तुकाराम महाराज बीज निमित्त बँकेसमोर उभारलेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. किर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. राजू कावळे महाराज तसेच ह.भ.प. बाळू पाटील महाराज यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला.
यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ सदस्य, कर्मचारी वर्ग तसेच अनेक भाविक उपस्थित होते. साग्रसंगीत पूजेनंतर उपस्थितांना आणि नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडून उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.
Belgaum Varta Belgaum Varta