बेळगाव : युवा समिती सीमाभाग च्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
चळवळीतून मोठा झालेला एक प्रामाणिक कार्यकर्ता आज मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर बेळगावातील मराठी माणसांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
बेळगावातल्या अनेक संस्था यशस्वीपणे चालवण्या बरोबरच सीमा लढ्याचे न्यायालयीन कामकाज तसेच रस्तावरच्या लढाईचा सातत्याने पाठपुरावा ते करतच आहेत आणि आता त्यांची अध्यक्ष पदावर निवड झाल्यामुळे सीमालढ्याला एक नवीन दिशा मिळेल.
आणी हा सीमाप्रश्न सुटून लाखो सीमावासियांना न्याय मिळेल अश्या सदिच्छा अध्यक्ष शुभम शेळके यांनी युवा समिती सीमाभागच्या वतीने व्यक्त केल्या.
यावर या लढ्यामध्ये आजवर अनेक नेते अनेक कार्यकर्ते आले आणि गेले. पण सीमाभागातील मराठी जनता आज ही लढ्याशी प्रामाणिक आहे.येत्या काळात सिमालढ्यासाठी ताकदीने लढूया आणी आपला प्रश्न सोडवून घेऊया, असे आश्वासन मध्यवर्तीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दिले.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचीटणीस मनोहर हुंदरे, शिवाजी हावळाणाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजित धामणेकर, रणजित हावळाणाचे, रमेश माळवी, सुरज जाधव, तसेच येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta