Sunday , April 5 2026
Breaking News

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा उद्या शुभारंभ

Spread the love

 

बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘जाॕईन स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन समारंभ उद्या रविवार दि. ५ रोजी सकाळी ९ वा. होणार असून बेळगाव महापालिकेच्या महापौर प्रिती कामकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, युवा उद्योजक कपिल भोसले, मार्कंडेय सोसायटीचे अध्यक्ष प्रसाद चौगुले प्रमुख पाहुणे तसेच हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित राहणार आहेत.
प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. 150 मुलां-मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोडवर गतिरोधक घालण्याची नागरिकांची मागणी

Spread the love  बेळगाव : नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोड येथे कार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *