Sunday , July 26 2026
Breaking News

सीमाभागातील सुपुत्र, रायगडची कर्मभूमी असलेले पत्रकार नरेश पाटील यांची स्व. दीपक दळवी यांना श्रद्धांजली

Spread the love

 

बेळगाव (धनंजय पाटील) : सीमाभागात जन्मलेले आणि सध्या रायगड जिल्ह्यात आपली कर्मभूमी घडवलेले पत्रकार नरेश पाटील यांनी बेळगाव येथे अल्पकाळाच्या दौऱ्यात मराठी अस्मितेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) चे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दिवंगत दीपक दळवी हे सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी लढणारे एक ठाम, अभ्यासू आणि जिद्दी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची उणीव दीर्घकाळ जाणवत राहणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील उपस्थित होते. त्यांनीही दिवंगत दळवी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

तसेच, आपल्या दौऱ्यादरम्यान नरेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करत शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.

नरेश पाटील यांचा हा दौरा केवळ औपचारिक नसून, सीमाभागाशी असलेली त्यांची जिव्हाळ्याची नाळ आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला. सीमाभागातून उभारी घेत रायगडमध्ये कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या मातीतल्या लोकांशी नाते जपले आहे, हे त्यांच्या या भेटीतून प्रकर्षाने दिसून आले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *