Monday , September 21 2026
Breaking News

पिढ्यान् पिढ्या बैलगाड्यांतून होतोय ऐन उन्हात ‘भक्तीचा प्रवास’

Spread the love

 

जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम; बेळगाव मधील भाविकांनी जपली परंपरा

निपाणी (वार्ता) : अनेक पिढ्यांपासून चैत्रात होणाऱ्या श्री जोतिबा यात्रेत काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. पण एक परंपरा मात्र अखंड राहिली ती म्हणजे श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी बैलगाड्यान येण्याची. बेळगाव परिसरातील अनेक गावातील भाविक पिढ्यान् पिढ्या भक्तिभावाने जपलेली ही परंपरा यंदाही यात्रेदरम्यान पाहायला मिळाली.
दुचाकी, बस, कार, जीप, टेंपोसह विविध वाहनांच्या सुविधा उपलब्ध असतानाही जोतिबाच्या दर्शनासाठी बैलगाड्यामधून येण्याची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा भक्तिभावाने जपली आहे. प्रतिवर्षी या यात्रेच्या चार दिवस आधीपासूनच हा उत्साही वातावरणातील भक्तीचा प्रवास जोतिबाच्या मार्गावर दिसून येतो.
“श्रीं”च्या नैवेद्याचा दिवस आणि पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर यात्रेसाठी आलेले बेळगाव भागातील भावीक कोल्हापूर, कागल, निपाणीमार्गे बेळगावकडे जात आहेत.
दोन दिवस सकाळपासून बैलगाड्यांचा ओघ वाढला होता. सजवलेल्या बैलजोड्या, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमासह विविध देवदेवतांची छायाचित्र बैलगाडीला लावून भाविक अंतर कापत बेळगावकडे जात आहेत. त्यांच्यासोबत बैलांसाठी सरकी, भरडा, पेंड असा पौष्टिक आहार, आवश्यक स्वयंपाकाचे साहित्य, बैलांचा चारा आहे.
——————————————————————–
रणरणत्या उन्हात भक्तीची आस
चैत्र महिन्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत भक्तीची आज लागलेले बेळगाव परिसरातील भाविक बैलगाडीत आवश्यक ते सामान ठेवून पायी जाऊन रणरणत्या उन्हात जोतिबाच्या भक्तीची आस पूर्ण केली आहे.
—————————————————————–
‘अनेक पिढ्यापासून आपल्या कुटुंबातील भाविक बैलगाडीने जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी जात आहेत. परंपरा जोपासत आता यंदा चौथ्या पिढीने बैलगाडीने जाऊन जोतिबाचे दर्शन घेतले आहे. ऊन असूनही कोणताही त्रास जाणवलेला नाही.’
-प्रकाश मुतकेकर,
भाविक भांदूर गल्ली, बेळगाव
—-

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *