Monday , September 21 2026
Breaking News

बसवेश्वर सहकारी संस्थेवर १०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Spread the love

 

बेळगाव : श्री बसवेश्वर बहुउद्देशीय सौहार्द सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी आणि संचालकांनी जनतेची १०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत शनिवारी संतप्त ठेवीदारांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.

बसवेश्वर सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजनगौडा रावसाहेब पाटील आणि इतर संचालकांनी सार्वजनिक ठेवीदारांकडून मोठी रक्कम गोळा करून ती हडप केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. याप्रकरणी अनेक ठेवीदारांनी बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागितली असून, न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास आरोपींनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चिकोडी आणि बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याला आरोपींना अटक करून हजर करण्याचे वॉरंट बजावले होते. यामध्ये फौजदारी गुन्हा क्रमांक ४०४, २३ सह अनेक प्रकरणांचा समावेश आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले असून, आरोपी सापडत नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या टाळाटाळीची गंभीर दखल घेत न्यायालयाने चिकोडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

यावेळी एन. आर. लातूर, ज्योती पाटील, रूपेश लातूर, शीतल बिलावर, काजल नायक, कीर्ती कांबळे, सुभाष बागेवाडी, काजमील डायस, अंजलीदेवी ढवळेश्वर यांच्यासह अनेक ठेवीदार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *