Wednesday , March 4 2026
Breaking News

जायंट्स मेन संस्थेचा अधिकार ग्रहण समारंभ उद्या

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन ) या सेवाभावी संस्थेचे नुतन अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ व सहकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.डॉ. एस. पी. एम. रोडवरील शिवम हॉल येथे संध्याकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आ. अभय पाटील तसेच जायंट्स फेडरेशनच्या अध्यक्षा तारादेवी वाली व जायंट्स स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर उपस्थित राहतील. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष सुनील मुतगेकर व अविनाश पाटील, सेक्रेटरी मुकुंद महागांवकर, खजिनदार यल्लाप्पा पाटील संचालक मंडळ :- विश्वास पवार, एस. सुरेश, सुनील चौगुले, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, आनंद कुलकर्णी, दिगंबर किल्लेकर, मधु बेळगांवकर, पांडुरंग पालेकर, पद्मप्रसाद हुली व धीरेंद्र मरिहळ्ळी.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन अध्यक्ष संजय पाटील व सेक्रेटरी विजय बनसुर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *