
बेळगावातील सिव्हील इस्पितळ रोडवरील घटना

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह आज मंगळवारी आलेल्या पावसाने बेळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मार्गावरील वादळी वाऱ्याने झाड कोसळले कोसळलेले. झाड कोसळल्याने अंदाजे 25 ते 30 दुचाकींचे नुकसान झाले आहे. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे सदर मार्गावर एकच तारांबळ उडाली पाहायला मिळाली. मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली आहे. दरम्यान एका दुचाकी चालक आजच्या या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta