Monday , September 21 2026
Breaking News

माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ४०० रुग्णांची तपासणी

Spread the love


माणगांव (नरेश पाटील) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि. १८ ते २२ एप्रिल दरम्यान आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. दि. १९ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माणगाव तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील सुमारे ४०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्धघाटन तालुका समन्वय समिती अध्यक्ष इकबाल धनसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तुकाराम सुतार, माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे, तारतंत्री संजय गांधी उपस्थित होते. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदिप इंगोले, बालरोग तज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर, भिषक डॉ. तुषार शेठ, आयुष विभाग डॉ. दिपक देशमुख, स्त्री रोग तज्ञ डॉ. श्रुती निकम, ऑर्थो सर्जन डॉ. समीर शेलार, नेत्र रोग तज्ञ डॉ. शंतनू डोईफोडे, डॉ. प्रियांका, डॉ. तेजल गायकवाड, डॉ. स्नेहा व उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये कान नाक घसा, पोटाचे विकार, मुतखडा, लहान मुलांचे आजार, डोळ्यांचे विकार, स्त्रियांचे आजार, किडनी विकार, हाडांचे आजार, हृदयरोग, दातांचे विकार यांचे तज्ञ डॉक्टर मार्फत मोफत वैद्यकीय तपासणी निदान व उपचार करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *