Thursday , March 5 2026
Breaking News

गियर हेड स्टुडिओचा शुभारंभ; सर्व प्रकारच्या सायकल एकाच छताखाली उपलब्ध

Spread the love


बेळगाव : हनुमान नगर जवळ बॉक्साइट रोडवरील गणश्री स्क्वेअर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या गियर हेड स्टुडिओ या सर्व प्रकारच्या सायकल विक्री शोरूमचे उद्घाटन कारंजी मठ बेळगावचे प. पु. गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून नुकतेच करण्यात आले.


यावेळी झालेल्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आर. एन. हारगुडे, कॅप्टन खटावकर, ओमर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी हे होते. यावेळी व्यासपीठावर शोरूमचे संचालक प्राचार्य आर. जी. देसाई व मीना देसाई उपस्थित होत्या. प्रारंभी प्राचार्य आर. जी. देसाई यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना गुरु सिद्ध स्वामींची यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या काळात शरीरसंपत्ती हीच खरी संपत्ती असून ती जपण्यासाठी आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे त्यामुळे सायकल चालवणे हा उत्तम व्यायाम होऊ शकतो असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनीही सायकल चालविल्यामुळे शरीर सुदृढ राहू शकते व इतर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजीत चौगुले यांनी केले. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन देसाई यांना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *