बेळगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाज सेवा संस्था आणि जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कुद्रेमानी आणि तुरमुरी (ता. जि. बेळगाव) येथे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यरत असलेल्या निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी संस्थेने जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव या संस्थेच्या सहकार्यातून कुद्रेमनी आणि तुरमुरी याठिकाणी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे लक्षात घेऊन निर्मिती संस्थेने ग्रामीण भागात ही डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
कुद्रेमनी येथे या मोहिमेला सुरुवात झाली. शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुद्रेमनी येथील ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कुद्रेमनी माध्यमिक शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष ईश्वर गुरव हजर होते. माजी ग्रा. पं. सदस्य नागेश राजगोळकर यांनी संस्थेच्या कार्याला आणि वाटचालीला शुभेच्छा देत भविष्यात संस्थेच्या कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मधुरा गुरव -मोटराचे यांनी लसीकरणाचा उद्देश सांगितला. सदर लसीकरण मोहिमेचा कुद्रेमनी येथील 800 आणि तुरमुरी येथील 200 नागरिकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. जी. पाटील सरांनी केले. यावेळी संस्थेच्या सदस्या रेणुका गुरव, माया पाटील, अश्विनी बडसकर, छाया बडसकर, आशा जांबोटकर, प्रणाली गुरव आदी उपस्थित होत्या.