बेळगाव : बेळगावातील टिळकवाडीतील तिसरे रेल्वे गेट खानापूर रोडवरील गजानन सॉ मिलजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना अडचण होत आहे. याबाबत महापालिका अधिकार्यांना वारंवार कळवूनही काहीच उपयोग झाला नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
बेळगावातील टिळकवाडीतील तिसर्या रेल्वे गेटजवळील गजानन सॉ मिलजवळील भागात स्वच्छतेचे थैमान माजले आहे. येथील गटारी बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत येऊन साचत आहे. त्याशिवाय बाजूलाच उंचावर असलेल्या चन्नम्मा नगरातील सांडपाणीही याठिकाणी येऊन रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे येथून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका अधिकार्यांना याबाबत तक्रार केली असता, हे काम आमचे नसून, सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारा असे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारले असता, दोन दिवस थांबा असे सांगून टाळाटाळ केली जात आहे. एक महिना होऊनही कोणीही ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेईनासे झाले आहे अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta