Wednesday , March 4 2026
Breaking News

ज्येष्ठ कवी यल्लाप्पा पालकर यांच्या भावांकुर कवितासंग्रह उद्या प्रकाशन

Spread the love

 

बेळगांव : भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन
गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावाकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थित उपस्थित होणार आहे.
एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव आणि गर्लगुंजी ग्रामस्थ आणि इतर संस्थानच्या वतीने ज्येष्ठ कवी यल्लाप्पा पालकर त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक व निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक, ज्येष्ठ कवी आणि पत्रकार श्री. शिवाजी शिंदे, कवी प्रा. निलेश शिंदे हे उपस्थित असणार आहेत. त्याबरोबर खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक आणि हितचिंतक हे उपस्थित राहणार आहेत. गावातील पांडुरंग सावंत, हनमंत मेलगे, राजाराम सिद्धांनी, परशराम चौगुले, अनुराधा निटूरकर, सुरेश मेलगे, रेखा कुंभार, प्रसाद पाटील, आबासाहेब पाटील, सदानंद पाटील यासह मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *