Sunday , September 20 2026
Breaking News

“गुरुवंदना” कार्यक्रमास्थळी पोलीस प्रशासनाची भेट

Spread the love

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात पोलीस प्रशासनाने आज संपूर्ण कार्यक्रमाचे माहिती जाणून घेतली छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेच्या मिरवणुकी मार्गाची पाहणी केली तसेच आदर्श विद्या मंदिर पटांगणावर उपस्थित राहून आढावा घेतला. कार्यक्रमास उपस्थितांची संख्या किती असेल, पार्किंगची व्यवस्था याबाबत डीसीपी रवींद्र गडाडी, एसीपी कट्टीमणी, पोलिस निरीक्षक विनायक बडीगेर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली.
यावेळी मराठा समाजाचे किरण जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली आणि प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करावे अशी विनंती केली.


दरम्यान आज बेळगाव परिसरातून विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवून कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
पपोलीस आधिकाऱ्यांशी चर्चा करतेवेळी अनंत लाड, रमेश रायजादे यांच्यासह समजातील प्रमुख हजर होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *