Saturday , October 19 2024
Breaking News

कुंतीनाथ कलमनी यांना प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

Spread the love

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हल्लीये संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ कलमणी यांना दक्षिण भारत जैन सभेतर्फे प्रतिष्ठेच्या प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
15 मे रोजी सांगली शहर महाराष्ट्र येथे दक्षिण भारत जैन सभेचे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शताब्दी सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या 23 वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यात ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत असलेले आणि सध्या हल्लीये संदेश प्रादेशिक कन्नड वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत असलेले कुंतीनाथ कलमणी यांनी जैन समाजातील सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी झटत समाजसेवेचा विडा उचलला आहे. त्यांच्या सेवेबद्दल दक्षिण भारत जैन सभेने या पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे कर्नाटक श्रवणबेलाचे डॉ. सी. पी. कुसामा यांना आचार्य कुंद कुंद प्राकृत साहित्य संशोधन आणि लेखन पुरस्कार, म्हैसूरचे मोहन शास्त्री यांना आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार, बंगळुरूच्या डॉ. अजित मुरगुंडे यांना श्री. बाळ पाटील डेलळरश्र र्लीश्रीींरश्र अवेअरनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आला.
या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व शताब्दी समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा, चेअरमन आर. ए. पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोर्ले, सांगलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *