Thursday , March 5 2026
Breaking News

भवानीनगर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी समाजसेवक मधू कलंत्री ताब्यात

Spread the love

बेळगाव : भवानीनगर येथे झालेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असणार्‍या शहापूर येथील समाजसेवक मधू कलंत्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त हाती आले आहे. समाजसेवेच्या पडद्याआडून खुनाचे कारस्थान करणार्‍या या कुतंत्री व्यवसायिकाची माहिती पोलिस यंत्रणेने अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.
मूळचा हलगा येथील रहिवासी असणार्‍या तसेच भवानीनगर येथे राहत असणार्‍या राजू दोड्डबोम्मन्नवर (वय 41, मूळ रा. हलगा बस्तवाड) यांचा 15 मार्च रोजी खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी त्याच्या पत्नीसह अन्य काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र सदर प्रकरणाचा मास्टरमाइंड असणारा हा समाजसेवक आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
खूनाच्या घटनेनंतर या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, अशी माहिती पोलिसायुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी त्यावेळी दिली होती. खुनाची घटना भल्या पहाटे घडली. तसेच यामागील हल्लेखोराने वापरलेली पद्धत देखील वेगळ्या स्वरूपाची होती. त्यामुळे याच्या माहिती संकलनाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे, असे त्यांनी सांगितले होते.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *