बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना सध्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल खानापूर आणि कित्तूर या तालुक्यांमध्ये मिरची उत्पादनाचे प्रमाण मोठे आहे. मात्र सध्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून योग्य भाव उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकर्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच बरेच ठिकाणी शेतकर्यांची योग्य दराअभावी फसवणूक होत आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta