
बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते उचगाव मधील श्री ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय पारायण मंडळाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि नामफलकाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्व समाजाच्या, सर्व भाषेच्या विकासाला सामान प्राधान्य देण्यात येते. यासाठी संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे आपल्याला सहकार्य मिळत आहे. आगामी काळात ग्रामीण मतदारसंघातील विकास हे राज्यात आदर्श ठरेल, अशी आशा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. तसेच येथील युवकांसाठी रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवर, युवराज कदम, रवळु कणबरकर, युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, राजू बांडगे, दोनकरी, बाळू गडकरी, ज्योतिबा, वैजू गोजगेकर आदींसह ज्ञानेश्वर ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta