Sunday , September 8 2024
Breaking News

काँग्रेसवर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची टीका

Spread the love

बेळगाव : काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जीवनात कोणताही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. गायीचे रक्षण केले नाही. त्याच गायीच्या हत्येसाठी मात्र जनतेला पाठिंबा दिला, अशी टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली.

बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या शेतकरी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला. मात्र शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणे आणण्यासाठी गेल्या ६० वर्षात काँग्रेसने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. गायीचे रक्षण केले नाही. त्याच गायीच्या हत्येसाठी मात्र जनतेला पाठिंबा दिला, अशी टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. शिवाय आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सत्तेवर येणे शक्य नसल्याचे सांगत यापुढे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप पक्षाच्या माध्यमातून समर्थपणे कार्य करतील, असे कडाडी म्हणाले.

शेतकरी मोर्चा कर्नाटकाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात किसान सन्मान निधी, सबसिडी यासारख्या अनेक योजनांचा लाभ घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. ७५ तसाच्या आत निर्णय घेण्यात आले आहेत. दररोज केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम आखण्यात येत असल्याचेही इराण्णा कडाडी म्हणाले.

काँग्रेसकडून आर एस एस संघटनेवर होणाऱ्या टीकांसंदर्भात प्रतिक्रिया देताना इराण्णा कडाडी म्हणाले, आर एस एस चे भूत काँग्रेस नेत्यांना का चढले आहे? जे काही असेल ते त्यांनी आमच्या समोर बोलावे, परंतु अशा पद्धतीने मागे का बोलले जाते याबद्दल आपल्याला समजत नाही. आर एस एस नपुसंक नाही तर संपूर्ण देशाला काँग्रेसने नपुसंक बनविले असल्याचे ते म्हणाले. आर एस एस हि संघटना राष्ट्रवादी संघटना आहे. देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्णपणे आर एस एस प्रयत्नशील असते असे इराण्णा कडाडी म्हणाले. शिवाय नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या काँग्रेसला नैतिकताच नसल्याचे कडाडी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *