Saturday , September 21 2024
Breaking News

बेळवट्टी येथे गणेश मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात

Spread the love

बेळगाव : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील श्री गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिराच्या मुख्य उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष डी. एन. देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष बी. देसाई, कृष्णकांत बिर्जे, बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक समरसेन पाटील, विठ्ठल नाकाडी, अ‍ॅड. सुरेश देसाई आदी उपस्थित होते.
सोमवारी श्रीमूर्तीचे गावात आगमन झाल्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शंकर देसाई यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. दुसर्‍या दिवशी संकेश्वर येथील मदन पुराणिक गुरुजी यांच्या अधिपत्याखाली होमहवन, स्नान, शुद्धीकरण, पूजा, अर्चन आदी विधी पार पडले. मधुकर देसाई यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर गावातील माहेरवासीनींचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.
नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम पार पडला. अ‍ॅड. सुरेश देसाई यांनी कळस पूजन केले.
बुधवारी सकाळी 11 वाजता मंदिराचा मुख्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिराच्या इमारतीचे डॉ. संतोष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बैलूरचे कृष्णकांत बिर्जे यांनी मंदिराच्या गाभार्‍याचे उद्घाटन केले.
ओलमणी येथील हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत, सयाजी देसाई, नारायण नलावडे, रवींद्र हरगुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
बी. बी. देसाई, एन. के. नलावडे, मधुकर नलावडे, म्हाळू होसुरकर, मारुती चांदीलवकर, डॉ. अर्जुन पाटील, रामलिंग बाळू पाटील, वैष्णवी सुतार आदींच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. संतोष देसाई, अ‍ॅड. सुरेश देसाई, निंगो भोगन, मारुती कांबळे, संतोष नलावडे, नितीन पाटील, संजय नलावडे आदींचा सत्कार करण्यात आला. समरसेन पाटील, विठ्ठल नाकाडी, कृष्णकांत बिर्जे यांची यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली. आर. बी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, मनोहर बेळगावकर आदींनी कार्यक्रमादरम्यान भेट देऊन शुभेच्छा दिल्या. बेळवट्टी, ईनाम बडस, बिजगर्णी, किणये, कर्ले, कल्लेहोळ, ओलमणी, नावगे आदी ठिकाणच्या भजनी मंडळाचे तीन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *