Saturday , October 19 2024
Breaking News

विश्व भारत सेवा समिती अध्यक्षपदी शारदा चिमडे

Spread the love

बेळगाव : विश्व भारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली.
संस्थेचे उपाध्यक्ष नेताजी कटांबळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी पिंगट व संचालक पुंडलिक कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपसचिव शंकर चिट्टी यांनी प्रास्ताविक केले.
पंडित नेहरू कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी कॉलेजच्या विकासाबद्दल माहिती दिली. सचिव प्रकाश नंदिहळ्ळी यांनी संस्थेचा अहवाल सादर करून संस्थेच्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली.
सभेच्या विषयानुसार पुढील पाच वर्षासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सदस्य व विक्रीकर विभागाचे निवृत्त अधिकारी सुभाष नाईक यांनी कामकाज पाहिले.
यावेळी पुढील पाच वर्षासाठी पदाधिकारी मंडळाची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षा शारदा चिमडे, उपाध्यक्ष नेताजी कटांबळे, सचिव प्रकाश नंदहळ्ळी, उपसचिव शंकर चिट्टी, संचालक म्हणून निंगोजी पार्लेकर, परशराम गोरल, विमल मुचंडी, अन्नपूर्णा वांगेकर, मंगल नंदिहळ्ळी, एस. व्ही. साखळकर, गजानन घुग्रेटकर, वाय. एन. कुकडोळकर, अनंत देसाई, बी. बी. शिंदे, विमल कंग्राळकर यांचा समावेश आहे.
मयूर नागेनहट्टी यांनी सूत्रसंचालन केले तर परशराम गोरल यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *