बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी येळ्ळूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलं.
सायकल ही एक परवडणारी वाहतूक आहे आणि ती पर्यावरणालाही धोका देत नाही. सर्वांनी सायकलचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन याचा पर्यावरणाला लाभ होईल, असा संदेश वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या वतीनं देण्यात आला. येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी देखील या मोहिमेत सहभाग दर्शवला होता.