Monday , December 23 2024
Breaking News

बेळगावात भीषण अपघातात 9 जण ठार

Spread the love

बेळगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी बेळगावकडे निघालेल्या मजुरांचा क्रुझर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात 9 जण जागीच ठार झाले. ही भीषण दुर्घटना बेळगाव तालुक्यातील कल्याळ ब्रिजजवळ आज, रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा एकदा वाढण्याची भीती आहे. सांबरा-सुळेभावी रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या कामावर मजुरी करण्यासाठी गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ आणि आसपासच्या गावचे मजूर क्रूझरमधून बेळगावकडे निघाले होते. त्याच गावच्या दुसऱ्या क्रूझरला मागे टाकण्याच्या प्रयत्नात चालकाचे क्रूझरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मजूर ३ वाहनातून बेळगावला येत असत. त्याचप्रमाणे आजही ते निघाले होते. त्यावेळी तिन्ही क्रुझर चालकांत तू पुढे का मी, अशी स्पर्धा लागली. त्यातच हा भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तसेच उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून देण्यात आले आहेत. अक्कतंगेरहाळ गावचे अडिवेप्पा चिलभावी (वय ४५), बसवराज दळवी (वय ३३), बसनगौडा हन्मन्नावर (वय ४८), आकाश गस्ती (वय ३१), फकीरप्पा रणप्पा हरिजन (वय ५५), तसेच एम. मल्लापूर गावचे बसवराज मल्लप्पा सनदी (वय ४८), दासनहल्लीचे कृष्णा रामप्पा खंडूर (वय ३६) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त क्रुझर गोकाक तालुक्यातील अंकलगीहुन बेळगावकडे येत होती. रस्त्यावरील उतार आणि वळणामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडेला खाली कोसळल्याने हा अपघात झाला आहे. यात ७ जण जागीच ठार झाले असून १०जण जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
अपघातग्रस्त क्रूझरचा चेंदामेंदा झाला आहे. क्रेन मागवून क्रुझर अपघातस्थळावरून बाजूला काढण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांनी जिल्हा इस्पितळाच्या शवागाराबाहेर जमून एकच हंबरडा फोडला. पती, मुलगा गमावलेल्या महिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.
अपघातग्रस्त क्रूझरमधील सिद्राई कुंदरगी याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मंजुरीसाठी आम्ही बेळगावकडे येताना क्रुझर चालकाने दुसरी वाहनाला ओव्हरटेक करताना ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे. आताच २ दिवसांपासून आम्ही येथे मोलमजुरीसाठी येत होतो. तशात हा भयंकर अपघात झाल्याचे त्याने सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *