
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकासकामे विविध टप्प्यात राबविण्यात येत असल्याची माहिती आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प येथे 38 लाख रुपये खर्चातून काँक्रीट रस्ता कामाला भूमिपूजन करून चालना दिल्यानंतर त्या बोलत होत्या. आ. हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न आहे. त्यामुळेच विकासकामांची यादी करून एकानंतर एक या पद्धतीने कामांना प्रारंभ करण्यात येत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवून कामे करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी कल्लाप्पा संपगावी, दुंडाप्पा हलकी, गदगय्या हिरेमठ, संतोष कंबी, रामनगौडा पाटील, निंगाप्पा तळवार, निंगाप्पा होन्निहाळ, सोमय्या कंबी, निंगाप्पा वाली, बसवराज डोंगरगावी, सुवर्णा पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta