बेळगाव : सरकार अंगणवाडी सेविकांकडून सर्व ती कामे करून घेतो, मात्र त्यांचे वेतन वेळेवर देण्यात येत नसल्याने आज सीआयटीव्हीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर केले.
गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे वेतन थकित आहेत. सध्या शाळा कॉलेज सुरू झाले असल्याने मुलांना शिक्षणाकरिता लागणारे साहित्य आणण्याकरिता अडचण भासत आहे. तसेच काही महिलांना आपल्या पती शिवाय आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलावा लागत आहे. त्यातच अंगणवाडी सेविकांचे वेतन सरकारने दिले नसल्याने त्या डबघाईला आल्या असून त्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या वेतन लवकरात लवकर सरकारने द्यावे याकरिता आज जिल्हाधिकार्यांना सीआयटीव्हीच्या तालुकाध्यक्ष मंदा नेवगी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका सुरेखा नंदिहळ्ळी, निता पाटील यांच्या समवेत आणि अंगणवाडी शिक्षिका देखील उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta