बेळगाव : जायन्ट्स प्राईड सहेलीची या वर्षीची थीम आहे ‘बी सेल्फ लेस‘ म्हणजे ‘स्वत:साठी जगा‘ स्वत:साठी जगताना स्वत:ची सुरक्षा पण महत्त्वाचे आहे. दररोज आपण पेपरमध्ये कुठे ना कुठे बायकांवर होणार्या अत्याचारांच्या बातम्या वाचतो आणि हळहळ व्यक्त करतो पण त्यासाठी आपण काही करू शकत नाही म्हणूनच प्राईड सहेली यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी तसेच आपल्या मुली व भगिनी यांच्या सुरक्षिततेसाठी ‘पेपर स्प्रे‘ निर्मिती सुरू केली आहे. हा ‘पेपर स्प्रे‘ आकाराने लहान असल्याने सर्व स्त्रियांच्या पर्समध्ये सहज बसतो.
उशिरा कामावरून येणार्या स्त्रिया तसेच उशिरा क्लासेस संपवून येणार्या विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असतो त्यांच्या मनात कायम भीती असते हीच भीती कमी करण्यासाठी हा ‘स्प्रे‘ कामाला येतो. हा ‘स्प्रे‘ काळीमिरीपासून बनवण्यात येतो. त्यामुळे तो खूप स्ट्राँग असतो. तो स्प्रे वापरल्याने चेहरा व डोळ्याची खूप आग होते त्यामुळे अडचणीच्या वेळी त्या स्त्रीला पळून जाण्यासाठी किवा पर्याय शोधण्यासाठी वेळ मिळतो. प्राईड सहेलीच्या सदस्यांनी स्वत: बनवला आहे. त्याचा प्रसार सर्व शाळा, कॉलेजमध्ये करणार आहेत. त्यामुळे ज्यांना आपली बहीण, आई, मुलगी व पत्नी यांची काळजी वाटते त्यांनी हा ‘स्प्रे‘ त्यांना गिफ्ट करावे व त्यांना त्यांच्या जवळ ठेवण्यास सांगावे हा स्प्रे ‘अॅड ऑन कलेक्शन‘ जेएनएमसी, मेन स्टाईल, किर्लोस्कर रोडमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. यानंतर हा ‘स्प्रे‘ सर्व शाळा व कॉलेजमध्ये उपलब्ध करण्यात येईल. या स्प्रेची किंमत फक्त वीस रुपये आहे.
या स्त्रीची निर्मिती मधून जो प्राईड सहेलीला नफा मिळणार आहे. त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta