Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगावात पौरकार्मिकांचे ठिय्या आंदोलन व निदर्शने!

Spread the love

सेवासुरक्षा, घरे देण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सर्व 548 आणि भयकंत्रटी तत्वावर काम करणार्‍या 551 पौरकार्मिकांना सेवेत कायम करावे या व अन्य मागण्यांसाठी पौरकार्मिकांनी बेळगावात आज एल्गार पुकारला. शहरातील चन्नम्मा चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करून पौरकार्मिकांनी निदर्शने सुरु केली आहेत.
बेळगावातील पौरकार्मिकांनी आपल्या मागण्यांसाठी इशारा दिल्याप्रमाणे आजपासून संप पुकारला आहे. सेवेत कायम करण्यासह घरे देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 2005-06मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी मान्य केल्याप्रमाणे 1973मध्ये राज्यातील अन्य जिल्ह्यातील पौरकार्मिकांना दिल्याप्रमाणे जागा हक्कपत्रे द्यावीत, बेळगाव पालिकेने क्वार्टर्समध्ये राहणार्‍या पौरकार्मिकांना घरे देऊन हक्कपत्रे द्यावी, अशी मागणी पौरकार्मिकांनी केली आहे.
यासाठी आज बेळगावातील चन्नम्मा चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करून पौरकार्मिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पौरकार्मिकांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे चन्नम्मा चौकातील वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर पौरकार्मिकांनी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. पौरकार्मिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला यांच्या नेतृत्वाखाली विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, विजय कोल्हापुरे, रवी मेदापुरी अशोक चव्हाण, गुरुनाथ सावंत यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *