बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेत पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. मात्र पात्रतेच्या आधारावर त्यांना सेवेत कायम करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासक नितेश पाटील यांनी सांगितले.
बेळगावात पौरकार्मिकांनी आजपासून सुरु केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यासाठी केवळ बेळगावातच नव्हे तर राज्यभरात आंदोलन सुरु आहे. बेळगावात केवळ 133 पौरकार्मिक सेवेत कायम आहेत. पात्रतेच्या आधारावर पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. बेळगावला 1500 पौरकार्मिकांची गरज आहे. मात्र केवळ 133 पौरकार्मिक काम करत आहेत. सगळेच पौरकार्मिक संपावर गेल्याने आज बेळगाव शहराची स्वच्छता होऊ शकलेली नाहीय. लवकरात लवकर कचरा उचलून स्वच्छता राखण्यासाठी उपाय केले जातील असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta