बेळगाव : ऊसाच्या फडात बेकायदेशीरपणे गांजा पिकवल्याच्या आरोपाखाली गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना कुलगोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून हजारो रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ऊसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुलगोड पोलिसांनी फडावर छापा टाकून पिकविलेला 95 किलो गांजा जप्त केला. कुलगोड पीएसआय व सहकार्यांनी ही कारवाई केली. ही गांजा झाडे उगवल्याप्रकरणी पोलिसांनी बसाप्पा व सिद्दप्पा या पिता-पुत्रांना अटक केली आहे. या प्रकरणी कुलगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta