बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात चोरी करणार्या चोरट्याला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात घडली.
बेळगाव येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून चोरी करणार्या सराईत चोराला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचार्यांचे पैसे आणि मोबाईल चोरल्याप्रकरणी आरोपी मारुती मंगसुळी याला काल, सोमवारी रात्री अटक करून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी आरोपी मारुती मंगसुळीकडून बिम्स रुग्णालयातून चोरलेले दोन मोबाईल फोन व पैसे जप्त करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta