बेळगाव : गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूल येथे गुरुजनांचा पाद पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जीवनात मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतात. गुरुच्या कृपेने आयुष्याचा मार्ग बदलतो. युवा पिढीने गुरूंबद्दलचे आदर राखून त्यांचा आदर्श घ्यावा. गुरूंनी घालून दिलेल्या विचारांचा जीवनात उपयोग करून त्या संधीचे सोने करावे, असे विचार संघाच्या संचालिका ज्योती निलजकर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास ज्योती बाके, सुमंगला पुजारी, सारिका सिंदगी, विणा चौगुले, शितल पाटील, श्रुती येळ्ळूरकर, सुनीता मॅडम आणि मुख्याध्यापक कुडतुरकर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta